Ad will apear here
Next
बार्शी पोलीस ठाण्याचे उद्घाटन
सोलापूर : ‘बार्शी तालुका पोलीस ठाण्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जलद सेवा मिळेल,’ असा विश्वास पालकमंत्री विजय देशमुख यांनी बार्शी येथे व्यक्त केला.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून बार्शी पोलीस ठाण्याचे उद्घाटन पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी आमदार दिलीप सोपल, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे, तहसीलदार ऋषिकेश शेळके आदी उपस्थित होते.

‘बार्शी तालुका पोलीस ठाण्यामुळे बार्शी शहरातील नागरिकांना विविध सेवांसाठी दूर जावे लागणार नाही; मात्र नागरिकांनी शहरातील शांतता आणि सौदार्य कायम ठेवण्यासाठी पोलीस विभागाला सहकार्य करावे’ असे आवाहन ही देशमुख यांनी या वेळी केले.

या प्रसंगी आमदार सोपल, पोलीस अधीक्षक प्रभू यांचीही भाषणे झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी कबाडे यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZYRBO
Similar Posts
‘सोलापुरात फळ सुविधा केंद्र उभारणार’ सोलापूर : ‘सोलापूर व आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या फळांची चांगल्याप्रकारे साठवणूक व्हावी, त्यावर प्रक्रिया करता यावी यासाठी पणन मंडळामार्फत सोलापुरात फळ सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे,’ अशी घोषणा सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केली.
‘झाडांचा मुलाप्रमाणे सांभाळ करावा’ सोलापूर : ‘प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावावे आणि त्या रोपट्याचा मुलाप्रमाणे सांभाळ करावा’, असे आवाहन पालकमंत्री विजय देशमुख यांनी येथे केले.
‘टॅंकरबाबतचा प्रस्ताव ४८ तासांत पाठवावा’ सोलापूर : ‘या वर्षी सोलापूर जिल्ह्यात केवळ ३८ टक्केच पाऊस झाल्याने जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून टॅंकरसाठी मागणी येईल. अशी मागणी आल्यास टॅंकरबाबतचा प्रस्ताव ४८ तासांत पाठवावा,’ अशा सूचना पालकमंत्री विजय देशमुख यांनी दिल्या.
‘मोबाइल हॅंडवॉशचा उपक्रम उपयुक्त’ सोलापूर : ‘जिल्हा परिषदेने आषाढी वारीत वारकऱ्यांना हात धुण्यासाठी राबविलेला मोबाइल हॅंडवॉश (हात धुणे रथ) उपक्रम अतिशय उपयुक्त आहे. असे उपक्रम राज्यात विविध ठिकाणी भरणाऱ्या मोठ्या यात्रांमध्ये राबविल्यास त्याचा लाभ भाविकांच्या आरोग्यासाठी होईल,’ असे मत पालकमंत्री विजय देशमुख यांनी व्यक्त केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language